गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वि‍जेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तिमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच, अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते.

आमचे लेख, व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा वेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ( Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana ) अशा शेतकऱ्यांना नंतर त्यांच्या कुटुंबांना लाभ दायक ठरणार आहे.

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केली आहे. सन २००९ १० पासून सदर योजनेचे नामाभिधान शेतकरी जनता अपघात विमा योजना” असे करण्यात आले. सदर विमा योजना रु. १.०० लाख इतक्या विमा संरक्षणासह राबविण्यात येत आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

हे वाचले का?  PM Kusum Solar Scheme शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!

“शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे” नामाभिधान आता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,” असे करण्यात येत आहे. ही विमा योजना चालू सन २०१५ सुरू करण्यात आली आहे रु.२.०० लाख विमा संरक्षणासह राबविण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.

अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व यासाठी राज्यातील महसूल विभागाकडील ७/१२ वरील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वर्षे वयोगटातील खातेदार शेतकऱ्यांच्यावतीने, योजनेच्या मंजूर कालावधी करिता, प्रस्तुत शासन निर्णयाव्दारे विमा पॉलिसी उत्तरविण्यात येत असून खालीलप्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करण्यात येत आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारी भरपाई

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत शेतकर्‍याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही तो या योजने अंतर्गत लाभासाठी पात्र राहील.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना (Kutumb Arth Sahay)

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्यांकडे स्वतंत्ररित्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. तसेच, यापूर्वी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजने अंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील.

हे वाचले का?  शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 75 हजार रुपये | Mukhyamantri Saur Vahini Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

विमा दावा दाखल करताना जोडवायची आवश्यक कागदपत्रे

१) ७/१२
२) ६क
३) ६ड(फेरफार)
४) एफ. आय. आर.
५) पंचनामा
६) पोष्टमार्टेम रिपोर्ट
७) व्हिसेरा रिपोर्ट
८) दोषरोप
१०) दावा अर्ज
११) वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
१२) घोषणा पत्र अ व घोषणा पत्र ब (अर्जदाराच्या फोटासह) १३)वयाचा दाखला
१४) तालुका कृषि अधिकार पत्र
१५) अकस्मात मृत्यूची खबर
१६) घटना स्थळ पंचनामा
१७) इंनक्वेस्ट पंचनामा
१८) वाहन चालविण्याची वैध परवाना
१९) अपंगत्वाचा दाखला व फोटो
२०) औषधोपचारा चे कागदपत्र
२१) अपघात नोंदणी ४५ दिवसाचे आत करणे

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभ कधी मिळणार नाही

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभ धारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.

हे वाचले का?  प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन अर्ज सुरू.

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे यासाठी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागा तर्फे करण्यात आले आहे.

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top