Health insurance policy Portability सध्याच्या काळात आरोग्य विमा असणं ही काळाची गरज बनलेली आहे. आजच्या युगात सगळेच आरोग्य विमा काढून त्याचा लाभही घेतात. ज्या व्यक्तीने आपल्या नावे आधी पासून आरोग्य विमा घेतला आहे, त्या व्यक्तीला असा प्रश्न पडतो की सध्याची जी विमा पॉलिसी आहे, ती दुसऱ्या कंपनीत पोर्ट करावी का?
विमा पॉलिसी च्या अटी व शर्ती ह्या काळानुसार बदलत असतात. उपचाराचा खर्च देखील वाढू शकतो. विमा पॉलिसी च्या लाभ घेण्यासाठी विमा पॉलिसी अपडेट करून घेणे गरजेचे आहे.
तुम्हीही आरोग्य विमा बदलण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी पोर्ट म्हणजे काय? मायग्रेशन म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे नक्की काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहेत.
येथे पहा विमा पॉलिसी स्विच करण्याचे फायदे-तोटे
आजच्या लेखात आपण बघणार आहोत की, मायग्रेशन म्हणजे काय? पोर्ट म्हणजे काय? फायदे-तोटे काय आहेत? लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास नक्की शेअर करा.
Health insurance policy Portability पोर्ट म्हणजे काय?
आरोग्य विमा पॉलिसी बदलताना आपण जी विमा कंपनी बदलतो, त्या प्रक्रियेला पोर्ट असे म्हणतात. ज्या प्रकारे आपण एका मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कडून दुसऱ्या कंपनीत सिम बदलतो. त्याचप्रमाणे विमा पॉलिसी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीकडे बदलणे सोपे आहे.
परंतु यासाठी एक अट असते. ती अट म्हणजे जी व्यक्ती चार वर्षांपासून नियमित प्रमाणे आपली पॉलिसी रिन्यू करत असेल. त्याच व्यक्तीला मायग्रेशन करण्याची परवानगी मिळते.
येथे पहा विमा पॉलिसी स्विच करण्याचे फायदे-तोटे
मायग्रेशन(Migration) म्हणजे काय?
ज्या वेळेस तुम्ही त्याच कंपनीकडून किंवा तुमची कोणतीही जुनी पॉलिसी बदलून नवीन पॉलिसी घेता. त्यावेळेस जो बदल केलेला असतो. त्या बदलाला मायग्रेशन असे म्हणतात.
जुन्या आरोग्य विमा मध्ये सब लिमिट एक किंवा दोन टक्क्यांपर्यंत असल्याने तुम्हाला उपचाराच्या वेळी लाखो रूपयांचे नुकसान होण्याची शक्यता असते. सब लिमिट अपडेट करायचं असेल तर जेव्हा विमा पॉलिसी बदलता त्यावेळेस तुम्ही ते अपडेट करू शकता.
ज्या वेळी तुम्ही कंपनी बदलता त्या वेळी तुम्ही विमा प्लॅन सुद्धा बदलू शकता. विमा पॉलिसी घेताना किंवा बदलताना आपण ओपीडी खर्च आणि रुग्णालयातील बेडचे भाडं चेक करतो. त्याचप्रमाणे सब लिमिट किती आहे हे ही तपासायला हवं.
येथे पहा विमा पॉलिसी स्विच करण्याचे फायदे-तोटे
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Life Imprisonment 14 Years? जन्मठेप 14 वर्ष असते का ?
- Z Plus Security काय असते? Z Plus Security in Marathi
- फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana
- मोबाईल वापराबाबत सरकारी अधिकारी / कर्मचारी यांच्यावर नियमावली.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.