HSC 12th results 2021 चा आज निकाल येथे पहा.

HSC 12th results 2021
HSC 12th results 2021
Give a shoutout to Vasily Koloda on social.

HSC 12th results (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत

सन २०२१ मध्ये HSC 12th results Maharashtra (इ.१२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसास अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार, दिनांक ०३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

HSC 12th results (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

www.mahresult.nic.in व  https://msbshse.co.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

हे वाचले का?  Vadiloparjit Property वडील वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकू शकतात का?

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकालाबाबतचा अन्य तपशील

सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली HSC 12th results Maharashtra (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१०वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयाचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.

नवनविन माहिती

हे वाचले का?  PF खातेदारांना मिळणार 7 लाखांचा विमा, EPFO Members Insurance

१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ.१२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त  गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्याचा निकाल तयार करण्यात आलेला नाही.

Give a shoutout to Akson on social

या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील. अशी माहिती डॉ.अशोक मसले सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी प्रकटनाच्या माध्यमातून दिली आहे.

हे वाचले का?  पेट्रोल पंप, सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे सर्विस रोड परवानगी अशी मिळणार.

हे वाचले का?

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top