Pandit Dindayal Swayam Yojana पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना ही योजना 2016 17 मध्ये सुरू करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या गुणांवर आधारित पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची सोय करून देणे आणि निर्वाह भत्ता देणे हा पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Pandit Dindayal Swayam Yojana विद्यार्थी पात्रता:
या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
उमेदवार हा अनुसूचित जाती/ जमाती ओबीएस जमाती आणि आदिवासी जमातीचा असावा.
बोर्ड किंवा विद्यापीठाने घेतलेल्या मागील परीक्षेमध्ये एकूण गुणांपैकी 60 टक्के गुण आवश्यक.
येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे
अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचा आधार कार्ड हे राष्ट्रीयकृत बँकेसोबत लिंक असणे आवश्यक.
पालकाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनाद्वारे ज्यावेळी शिष्यवृत्तीसाठी उत्पादन मर्यादित वाढ होईल त्यानुसार पालकाची वार्षिक उत्पादन मर्यादा या योजनेसाठी लागू राहील
या योजनेचा लाभ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित शहरांमध्ये राहणे आवश्यक
विद्यार्थ्यांनी ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आहे त्या शहराचा तो विद्यार्थी रहिवासी नसला नसावा
अटी व शर्ती:
सदरचा विद्यार्थी बारावीनंतरची उच्च शिक्षण घेत असावा.
केंद्र शासनाच्या पोस्टमार्ट्रिक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल तसेच दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा अभ्यासक्रमसाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
एका शाखेची पदवी किंवा पदवी उत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदवी उत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
यामध्ये प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकाला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा.
येथे क्लिक करून पहा आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांची संस्थेमधील किंवा महाविद्यालयातील उपस्थिती 80 टक्के पेक्षा अधिक असणे आवश्यक राहील.
विद्यार्थ्यांची निवड करताना गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र प्रत्येक वर्षी त्या विद्यार्थ्यास त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
योजनेचा लाभ बारावीनंतरचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल परंतु एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त सात वर्ष सतत योजनेचा लाभ घेता येईल.
सदर योजनेचा सात वर्षे लाभ घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यास वस्तीगृहात प्रवेश मिळणार नाही.
सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील.
विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वस्तीगृहामध्ये प्रवेश मोफत मिळालेला नसावा.
विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
अनुसूचित जाती व जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!
- PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत
- Proof of Property Ownership हे कागदपत्रे सिद्ध करतात जमिनीवरील स्वतःचा मालकी हक्क. बघूया कोणते आहेत हे पुरावे..?
- PM Matru Vandana Yojana Update प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू.
- Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र|
- buying seeds pesticides and fertilizers बियाणे, खते खरेदी करायची आहेत, फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या….!!!!
- Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना
- Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.