Salokha Yojana शेत जमिनीवरून दोन भावांमध्ये मोठे वाद होतात काही वेळेस हे वाद सामुपचराने सोडवता येत नाही, तर कधी कधी वाढ हे टोकाला जातात, त्यातून अनेक घटना घडतात. असे वाद मिटवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे ती म्हणजेच सलोखा योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटले जातील अशी आशा आहे.
Salokha Yojana सलोखा योजनेच्या अटी व शर्ती:
- सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणीची व मुद्रांक शुल्क मध्ये सवलत देण्याबाबतचे अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा राहील.
- सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकर्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्या शेतकर्याकडे किमान बारा वर्षांपासून असला पाहिजे.
सलोखा योजना फायदे येथे क्लिक करून पहा
- सलोखा योजना अंतर्गत दस्ता मध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटदार वर्ग /सत्ता प्रकार, पुनर्वसन/ आदिवासी/ कूळ इत्यादी सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे, अशा प्रकारची अट दस्ता मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.
- पहिल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेत जमीणीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे याव्यतिरिक्त इतर वैयक्तिक जमिनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही.
सलोखा योजना फायदे येथे क्लिक करून पहा
- सदर योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे व दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील.
- अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्य वापराच्या जमिनीस सदर योजना लागू असणार नाही.
- सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.
- सदर योजनेमध्ये दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित असेल तर त्याबाबत प्रमाणेच गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थिती करनुसार फेरफार आणि नावे नोंदविता येतील.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत
- Proof of Property Ownership हे कागदपत्रे सिद्ध करतात जमिनीवरील स्वतःचा मालकी हक्क. बघूया कोणते आहेत हे पुरावे..?
- PM Matru Vandana Yojana Update प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू.
- Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती
- Low Sand Rates स्वस्त दरात मिळणार रेती, घरकुलांना मिळणार गती……….!!
- Education Loan Repayment ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना…..
- CM Relief Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी: पात्रता, आवश्यक कागदपत्रे…. असा करा ऑनलाईन अर्ज….!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.