SARATHI छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत.
त्यानुसार (सारथी ) पुणे मार्फत राज्यातील लक्षित गटातील शेतकऱ्यांना सारथी संस्थेच्या खर्चाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, पुणे यांचेमार्फत हरितगृहातील व्यवस्थापन व अन्य 9 प्रकारची कृषी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विनामुल्य प्रशिक्षणासाठी राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील शेतकरी, युवक, युवतींकडून उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
SARATHI असे असेल प्रशिक्षण
हरितगृह व्यवस्थापन, शेड नेट हाऊस व्यवस्थापन, रोपाची अभिवृद्धी आणि भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापनाचे 5 दिवसाचे प्रशिक्षण फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणा अंतर्गत 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.
फलोत्पादन व्यवस्थापन प्रशिक्षणात लँडस्केप व्यवस्थापन, ऊती संवर्धन तंत्रज्ञान, ड्रायफ्लॉवर, प्लँट पार्टस् 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. आणि पुष्प रचनाचे 3 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.
फलोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अंतर्गत पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रम त्यात फुल पिके, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, प्रक्षेत्रावरील फुलांची, फिलरची लागवड तसेच पीक निहाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत भाजीपाला, शिमला मिरची, चेरी टोमॅटो, काकडीचे 5 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे काढणीपश्चात प्रशिक्षणातंर्गत फळ पिके व भाजीपाला यांचे काढणीपश्चात व्यवस्थापन व पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे 3 दिवसाचे प्रशिक्षण 40 प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल.
लाभार्थी पात्रता:
प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
तसेच मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या प्रवर्गातील असावा.
उमेदवाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे.
यासाठी लाभार्थ्यांचे मागील 3 वर्षांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.
SARTHI Pune विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!
अटी व शर्ती
प्रशिक्षण हे मराठी माध्यमात देण्यात येईल.
क्षमता बांधणी प्रशिक्षणे ही पूर्णकालीन निवासी असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी, पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल.
सदर क्षमता बांधणी प्रशिक्षण राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था मार्फत तळेगाव (दाभाडे) जि.पुणे येथे देण्यात येईल.
प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करुन क्रमवार निवडक पात्र उमेदवारांची यादी सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी येणारा प्रवास खर्च संबंधित प्रशिक्षणार्थीना स्वत करावा लागेल. उर्वरीत पात्र प्रशिक्षणार्थीचा विचार पुढील बॅचसाठी केला जाईल. याबाबतची सूचना सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही. प्रशिक्षण हे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था, सर्व्हे क्रमांक 398/400 सीआरपीएफ कॅम्प जवळ, जुना पुणे-मुंबई महामार्ग तळेगाव-दाभाडे, पुणे येथे राहील.
SARTHI Scholarship असा करावा सारथी शिष्यवृत्तीसाठी अर्ज!
SARATHI अर्ज कुठे करावा?
तरी ईच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या संकेतस्थळावर अथवा थेट एनआयपीएसटी च्या https://www.nipht.org वरील लिंक https://sarthi.nipht.org द्वारे 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत सादर करावे.
ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर कागदपत्रे हार्ड कॉपी 10 दिवसांच्या आत किंवा 10 नोव्हेंबर, 2023 पुर्वी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे यांचेकडे पाठविण्यात यावे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Credit Card Information जाणून घेऊया क्रेडिट कार्ड चे फायदे-तोटे ..!
- Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!
- Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….
- Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?
- Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….
- Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?
- Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, एकरी 50 हजार रुपये भाडे मिळणार, पडीक जमिनीसाठी!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.