तलाठी कामकाज परिचय:
सर्वसामान्यपणे तलाठी सझा १ ते ४ गावांचा मिळून झालेला असतो. तलाठयांना जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्य करावी लागतात. तलाठयांना महसुली अभिलेखेत ठेवणं आणि शासकीय वसुली करणे या प्राथमिक कामा सोबत तो गाव पातळीवरील महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी निरनिराळी गाव पातळीवरील कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात.
जसे निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीची कामे, मतदार याद्या तयार करणे, शिधापत्रिकांची कामे, नैसर्गिक आपत्ती वेळी मदत व सहाय्यता करणे, कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी कामे करणे, कृषी गणना करणे अशी निरनिराळी कामे करावी लागतात. तलाठ्यांची कार्य व कर्तव्ये सर्वसामान्यपणे पुढील प्रमाणे आहेत:
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार जमीन महसूलाचे गाव पातळीवरील अभिलेख ठेवणे व अद्ययावत करणे ही तलाठ्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. तसेच जमीन महसूलाची थकबाकी व इतर वसूली योग्य रकमांची वसूली व त्यांचे अभिलेखही ठेवणे हे तलाठ्याचे दुसरे महत्त्वाचे कर्तव्य आहे.
जमीन महसूलाची थकबाकी व इतर वसुली योग्य रकमांची वसुली व त्यांचे अभिलेखही ठेवणे हे तलाठ्याचे दुसरे महत्त्वाचे कर्तव्य आहे. वर्ष संपल्यानंतर त्या वर्षातील महसुली हिशोब तपासून बंद करणे व थकबाकी असणाऱ्या खातेदारांची यादी करून पुढील वर्षाकरिता थकबाकी मागणी निश्चित करणे.
येथे क्लिक करून पहा तलाठी यांची कामे/ कर्तव्ये
दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेले जमिनीचे हस्तांतरण व्यवहार विचारात घेऊन गा. नं. ७/१२ आणि गा. नं. ८ (अ) अद्ययावत करणे, मागणी निश्चित केल्यानंतर खातेदारांना मागणी नोटीसा बजावणे. शासकीय कर वसुलीचा पाठपुरावा करणं. वसूल केलेल्या आणि सरकारी खजिन्यात भरणा केलेल्या रकमेचा हिशोब नियमानुसार अद्ययावत ठेवणे.
वर्षाच्या शेवटी गाव पातळीवर हिशेबाचा तालुका पातळीवरील हिशोबाशी मेळ घालणे. शिक्षण कर, रोजगार हमी कर आणि तत्सम कराचे बाबतीत पीक पाहणी बिनचूक आणि वेळेवर करणे व त्यानुसार सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकार्यांना विनाविलंब सादर करणे, जेणेकरून अशा कराची मागणी सक्षम अधिकार्यांना निर्धारित मुदतीच्या आत निश्चित करणे शक्य होईल.
तलाठी यांची महत्त्वाची कामे/ कर्तव्ये (Talathi Kartavya) :
1. 1 ऑगस्ट रोजी नवीन महसुली वर्षाव प्रारंभ होण्याच्या सुमारास तलाठयाने ज्या ठेवावयाच्या असतात अशा सर्व नोंद त्याने उघडून , पृष्ठांकित कराव्यात व त्या सर्व वहया किमान एक पंधरवडा आधी तहसिलदाराकडे पाठवून 1 ऑगस्ट पूर्वी तहसिलदाराकडून स्वाक्षरित करवून घ्याव्यात .
2. वार्षिक प्रशासनिक अहवालाच्या संकलनासाठी आवश्यक असलेली माहिती जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख, यांच्याकडे तलाठयाने 1 ऑगस्ट नंतर लगेच पाठवावी . त्या माहितीबरोबरच, ज्यांची मोजमापे घ्यावयाची आहे अशा नवीन हिस्शांचे विवरणपत्रही, त्यांची मोजमापे घेण्याची व्यवस्था करण्यासाठी तहसीलदाराकडे सादर करावे.
3.तलाठी, त्याचवेळी किंवा त्यानंतर ताबडतोब, हंगामाच्या स्वरुपावर लक्ष ठेवावे आणि साप्ताहिक पर्जन्य आणि पिकांची स्थिती यांचे अहवाल तहसीलदारांना सादर करून, त्यांच्या प्रति मंडळ निरीक्षकाकडे पाठवाव्या आणि अशा प्रकारे आपत्ती येण्याचा संभव असल्यास तिच्यासंबंधी अहवाल देण्यास तयार रहावे.
4. तलाठी,त्याचवेळी खरीप पीक आणि कुळवहिवाट व सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करावा आणि 15 ऑक्टोबरापर्यंत ते पूर्ण करावे.
येथे क्लिक करून पहा तलाठी यांची कामे/ कर्तव्ये
5. त्यानंतर तलाठी रब्बी पीक आणि कुळवहिवाट आणि सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करून 31 डिसेंबरापर्यंत ते पूर्ण करावे.
6. तलाठ्याने मंडळ निरीक्षकास पिकाची आणेवारी तयार करण्यास व आवश्यक तितके पीक कापणी प्रयोग करण्यास मदत करावी.
7. तलाठी १५ डिसेंबरापर्यंत किंवा पिकांच्या परिस्थितीनुसार त्याच्या आधी, चालू वर्षीच्या जमीन महसूलाच्या तसेच मागील वर्षाच्या तहकूब जमीन महसूलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्याचे आदेश मिळवावे. जमीन महसूलाची तहकुबी आणि त्याची वसुली व सूट यासंबंधीच्या जिल्हाधिऱ्याच्या आदेशांना सर्वत्र प्रसिध्दी द्यावी.
8. दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस तलाठी गाव नमुना ८अ अद्ययावत करावा आणि गाव नमुना ८ब चा मागणी संबंधीचा भाग जमीन महसूल वसुलीस प्रारंभ करण्यासाठी तयार ठेवावा.
9. जिल्हाधिऱ्याने नियमान्वये विहित केलेल्या दिनांकांना तलाठ्याने जमीन महसूल वसुल करावा.
10. त्या वर्षामध्ये वसुलीसाठी नियत असलेला सर्व जमीन महसूल त्या वर्षाच्या 31 जुलैपूर्वी वसुल केला पाहिजे. आणि कोणतीही अनधिकृत थकबाकी वसुल केल्याशिवाय राहू देता कामा नये, या गोष्टी तलाठ्याने लक्षात ठेवाव्या.
11. शासनाच्या वतीने त्याला मिळालेल्या सर्व पैशाबद्दल तलाठयाने पावती दिली पाहिजे. पावती देण्यात तलाठ्याने कसूर केल्यास, मिळालेल्या रक्कमेच्या दुप्पटीपेक्षा अधिक नसेल इतक्या दंडास तो पात्र राहील. पहा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 77. त्याच्याकडे असलेल्या पावती पुस्तकांचा हिशेब दर्शविणारी नोंद वही त्याने ठेवावी.
12. तलाठी एक रोकड वही ठेवावी आणि तिच्यामध्ये त्याला मिळालेले सर्व पैसे आणि 15 दिवसाच्या आंत कोषागारात जमा केलेले पैसे हे दर्शवावे. कोणत्याही वेळी रू. 1000 पेक्षा अधिक रक्कम त्याने आपल्या हातात शिल्लक ठेवू नये.
येथे क्लिक करून पहा तलाठी यांची कामे/ कर्तव्ये
13. तलाठीने वसूल केलेला जमीन महसूल ज्या चलनाखाली शासकीय कोषागारता जमा केला असेल त्या चलनामध्येच त्याने जमीन महसूलाच्या वसुलीच्या प्रगतीचा अहवाल तहसिलदाराला द्यावा.
14. तलाठ्याने वर्षातील सर्व येणे रकमांची वसुली झाल्याबरोबर त्याचे सर्व महसुली लेखे लेखापरीक्षेनासाठी (जमाबंदीसाठी) तहसिलदाराला सादर करावे. यामध्ये ३१ मे पर्यंत सादर करावयाच्या गाव नमुना अकराच्या गोषवार्याचा देखील समावेश होतो.
15.तलाठ्याने ठेवलेल वर्षचे लेखे बरोबर आणि आवश्यक तेथे तालुका लेख्यांशी जुळणारे आहेत हे तहसिलदाराचे समाधान होईल अशा प्रकारे सिध्द करावे.
16.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याखालील नियम किंवा त्यावेळी अंमलात असलेला इुसरा कोणताही कायदा यांच्या अन्वये विहित केल्याप्रमाणे किंवा राज्य शासनाच्या आदेशानुसार किंवा राज्य शासन आणि आयुक्त यांच्या सर्वसाधारण आदेशाच्या आधीन राहून जिल्हाधिऱ्याने निश्चित केल्याप्रमाणे सर्व महसुली लेखे आणि रोकड वह्या, कार्यभाग अहवाल आणि इतर अभिलेख तलाठ्याने ठेवावे.
17. जमीन महसुलाच्या थकबाकीची आणि जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसुलीयोग्य असलेल्या सर्व रकमांची वसुली आणि अधिकार अभिलेख ठेवणे यासाठी तलाठी जबाबदार राहील आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्याखालील नियम किंवा त्यावेळी अंमलात असलेला कोणताही कायदा किंवा राज्या शासनाचे आदेश यांमध्ये तरतूद केलेली अशी सर्व कर्तव्ये आणि कार्ये तो पार पाडील.
येथे क्लिक करून पहा तलाठी यांची कामे/ कर्तव्ये
18.तालुक्याच्या वरिष्ठ महसूल किंवा पोलीस अधिकार्याने तसे करण्यास सांगितल्यावर, नोटीसा, आणि फौजदारी बाबीमधील तपासाचे अहवाल, जबान्या आणि तपासण्या यासारखे केंद्र किंवा राज्याशासन किंवा जनता यांच्या उपयोगासाठी आवश्यक असलेले गावाच्या संबंधातील सर्व लेखे तलाठ्याने तयार करावे.
19. तलाठ्याने,जमिनीच्या वापरामधील बदलाचा दिनांक अधिनियमाच्या कलम 44 च्या पोटकलम (4) अन्वये त्याला माहिती मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अकृषिक परवानगी देणार्या किंवा ज्याने दिली आहे असे मानण्यात येणार्या अधिकार्याला कळवावा.
- 20. (अ) गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे नष्ट करण्यास किंवा त्यामध्ये अनधिकृत फेरफार करण्यास प्रतिबंध करण्याचा तलाठ्याने प्रयत्न करावा.
- (ब) तथापि, गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे नष्ट केल्याचे किंवा त्यांमध्ये अनधिकृत फेरफार केल्याचे तलाठ्याच्या निदर्शनास आल्यावर,या संबंधातील नियमानुसार एक पंधरवड्याच्या आत ती पूर्ववत करण्याबद्दल किंवा दुरूस्त करण्याबद्दल त्याने जमीनधारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी.
- (क) वरील नोटीसीनूसार जमीन धारकाने ती चिन्हे पूर्ववत करण्याबद्दल त्याने जमीन धारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी.
- (ड) त्यानंतर, मंडल निरीक्षकाने ती चिन्हे त्यापुढील एका आठवड्याच्या कालावधीच्या आत पूर्ववत किंवा दुरूस्त करून न घेतल्यास, तहसिलदाराने ती शासनाच्या खर्चाने पूर्ववत किंवा दुरूस्त करून घेण्याची व्यवस्था करावी आणि असा खर्च जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करून घ्यावा; त्याखेरीज जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 145 अन्वये द्यावयाच्या एखाद्या शास्तीसही पात्र राहील.
- (इ) पूर्ववत किंवा दुरस्त करताना सीमा चिन्हांच्या एका संचाच्या जागी दुसरा किंवा दुसरे संच घातल्यास, सीमाचिन्हे दर्शविणाऱ्या नवीन व योग्य निशाण्या गाव नकाशांमध्ये दाखवण्यात याव्यात आणि ती गोष्ट जिल्हा निरीक्षक, भूमि अभिलेख याला कळवण्यात यावी. सीमा चिन्हांचे पुढील परिरक्षण व त्याप्रमाणे दुरूस्ती करण्याची कार्यवाही करावी.
21. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 149 खाली अधिकार संपादनाबद्दलचे मौखिक किंवा लेखी प्रतिवेदन मिळाल्याबद्दल तलाठ्याने संबंधित व्यक्तीला ताबडतोब लेखी पोच द्यावी.
22. तलाठ्याने अशाप्रकारे त्याला मिळालेल्या प्रत्येक प्रतिवेदनाची फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद करावी.
23.अधिनियमाच्या कलम 154 खालील नोंद करणाऱ्या अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही जिल्हाधिऱ्याने कळवलेले संपादन किंवा हस्तांतरण याची तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये तशाच प्रकारे नोंद करावी.
नव नवीन माहीती
- How to take sample for soil testing असे तपासा जमिनीचे आरोग्य…… हे आहेत याचे फायदे…!!!
- Post Office Schemes ह्या आहेत पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम 5 बचत योजना!!!
- Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती
- Senior Citizen Saving Scheme ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची योजना…. बघूया काय आहे योजना..
- Fal Pik Vima Yojana 2023 फळपीक विमा २०२३ अर्ज सुरू.…असा करा अर्ज…
24. तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये ज्या ज्या वेळी नोंद करील त्या त्यावेळी तत्काळ त्याने नोंदीची संपूर्ण प्रत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावावी आणि अधिकार अभिलेख किंवा फेरफार नोंदवही यावरून त्या फेरफारांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव आहे असे आढळेल अशा सर्व व्यक्तींना, त्याचप्रमाणे त्या फेरफारांमध्ये ज्याचा हितसंबंध असेल असे मानण्यास त्याला कारण दिसेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला त्याने लेखी कळवावे. त्या पेन्सिलीने लिहावा, आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यास आलेली नाही असा शेरा त्याने लिहावा.
25. फेरफार नोंदवहीमध्ये केलेल्या कोणत्याही नोंदीवर तलाठ्याकडे मौखिक किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास, त्याने विवादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद करावी. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तील आक्षेप मिळाल्याबद्दलच विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब द्यावी.
26.(अ) नोंद प्रमाणित करण्यास समक्ष असलेल्या, अव्वल कारकुन किंवा मंडल निरीक्षक याच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल किंवा भूमापन अधिकार्याने फेरफार नोंद वहीमधील नोंद प्रमाणित केल्यावर तलाठ्याने ती अधिकार अभिलेखामध्ये शाईने अभिलिखित करावी.
(ब) सक्षम प्राधिकाऱ्याने फेरफार नोंदवहीमधील नोंद रद्द केलेली असल्यास तलाठ्याने अधिकार अभिलेखात पेन्सिलीने केलेली नोंद खोडून टाकावी.
येथे क्लिक करून पहा तलाठी यांची कामे/ कर्तव्ये
27. तलाठ्याने, फेरफार नोंदवहीमधील प्रमाणित नोंदीनुसार संबंधित गाव नमुने आणि त्यांचे गोषवारे हे देखील दुरूस्त करून घ्यावेत. त्याचप्रकारे त्याने आवश्यक तेथे गाव नकाशामध्ये पेन्सिलीने दुरूस्ती करावी. मंडल निरीक्षकाने आवश्यक असल्यास, तपासणीनंतर ती शाईने करावी.
28. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 151 च्या पोटकलम 1 अन्वये केलेल्या मागणीप्रमाणे पुरविलेल्या माहितीची किंवा सादर केलेल्या कागदपत्रांची लेखी पोच तलाठ्याने माहिती पुरविणाऱ्या किंवा कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब द्यावी आणि असे कागदपत्र सादर केल्याचे त्यावर लिहून ते सादर केल्याचा दिनांक नमूद करणारी नोंद आपल्या सहीनिशी पृष्ठांकित करावी आणि आवश्यक असल्यास त्या कागदपत्राची एक प्रत ठेवून घेऊन ते ताबडतोब परत करावे.
29. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे, देणे आणि ठेवणे) नियम, 1971 अनुसार तलाठ्याने अधिकार अभिलेख तयार करावे व ठेवावे.
30.
- (अ) शेतजमीन धारकाकडून किंवा जमिनीचा महसूल देण्यास आद्यात: पात्र असलेल्या कुळाकडून लेखी अर्ज मिळाल्यावर तलाठ्याने अशा जमिनीसंबंधीच्या अधिकार अभिलेखाची प्रत असलेली एक पुस्तिका (खाते पुस्तिका) त्याला द्यावी.
- (ब) जमिनीच्या महसूलाच्या आणि धारकाकडून किंवा यथास्थितही कुळाकडून येणे असलेल्या इतर शासकीय रकमांच्या प्रदानासंबंधीची माहिती आणि तसेच त्याच्या जमिनीची मशागत आणि गाव लेख्यात दर्शविल्याप्रमाणे पेरणी केलेल्या पिकांची क्षेत्रे यासंबंधीची माहिती आणि विहित करण्यात आलेली किंवा यानंतर विहित करण्यात येईल अशी इतर माहिती तलाठ्याने ही पुस्तिकेमध्ये दर्शवावी.
- (क) महाराष्ट्र जमीन महसूल खाते पुस्तिका (तयार करणे, देणे आणि ठेवणे) नियम, 1971 या नावाच्या नियमानुसार तलाठ्याने ही पुस्तिका तयार करावी, द्यावी आणि ठेवावी.
हे वाचले का?
- तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून कंटाळला | Talathi office |Talathi Kamkaj कसे असावे मार्गदर्शक तत्त्वे |
- शासकीय जमीन मोजणीचे प्रकार चला माहिती करून घेऊया…!
- ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!
- गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहन्यायासाठी येथे क्लिक करा