Tukade Bandi Kayda 2023 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, १९४७. बदल करण्यासाठी महसूल व वन विभाग १४ जुलै, २०२३. अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र यांच्या मार्फत जाहीर करण्यात आले आहे.
नावात बदल “मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम, १९५९ ” या मजकुरा ऐवजी “महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम” असा नावात बदल केला जाईल .
नवीन येणाऱ्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम म्हणजेच तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 2023 मधील होणारे बदल पुढील प्रमाणे असतील. Tukade Bandi Kayda 2023
या मध्ये विहिरी, शेतरस्ता, सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन शिल्लक राहिलेली लगतची शेतजमीन, घर बांधकाम जागे करता, तुकडे बंदी व तुकडे जोड कायदा 2023 मधील होणारे बदल पुढील प्रमाणे असतील.
*1) जर विहिरी करिता जमिनीची आवश्यकता असेल तर*
विहीरीकरिता जमिनीच्या हस्तांतरणासाठी अर्जासोबत विहीरीकरिता जमिनीच्या भू-सहनिर्देशकाच्या समावेशासह पाण्याची उपलब्धता नमूद केलेले आणि विहीर खोदण्याची परवानगी असलेले भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरण (Groundwater Directorate Of Surveys & Development Agency) दिलेले ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल.
i ) विहीरीकरिता प्रस्तावित खरेदीदाराकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण करणे आवश्यक असेल म्हणजे बागायती करता 10 तर जिरायत जमिनी करता 20 गुंठे जमीन आवश्यक असेल,
ii ) जिल्हाधिकारी विहीरी करिता कमाल दोन आर पर्यंत म्हणजेच 2 गुंठे पर्यंत अशा प्रकारच्या जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी मंजूरी देतील.
iii ) जिल्हाधिकाऱ्याच्या अशा मंजुरी आदेशामध्ये विहीरीसाठी हस्तांतरित करावयाच्या प्रस्तावित जमिनीच्या भू-सहनिर्देकाचा समावेश असेल. जिल्हाधिकाऱ्याचे असा मंजुरी आदेश जमिनीच्या विक्रीदस्तासोबत जोडण्यात येईल..
iv ) अशा जमिनीच्या विक्रीदस्तानंतर, विहीर वापराकरिता मर्यादित” अशी नोंद अशा जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर शेरा म्हणून घेण्यात येईल.
घर बांधकामं व शेत रस्ता तुकडेबंदी बदल 2023 माहिती येथे पहा..!!
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Magel Tyala shettale मागेल त्याला शेततळे योजना अर्ज सुरू | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती
- कृषी मित्र कर्ज योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज…..!
- शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा