Cashless Mediclaim एखाद्या आकस्मिक वैद्यकीय परिस्थितीमध्ये पैशांची गरज पडत असते. हॉस्पिटलमध्ये जितकी रक्कम सांगितली आहे, तितकी आपल्याकडे ताबडतोब उपलब्ध असेलच असे नाही. अनोळखी ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असताना आर्थिक अडचण येऊ शकते. आपण जर आरोग्य विमा घेतला असेल तर कॅशलेस विमा खरेदी करावा. अडचणीच्या वेळी कॅशलेस विमा पॉलिसीच्या उपयोग होतो. कॅशलेस विमा घेतल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये पैसे भरावे लागत नाही. त्या बदल्यात आपल्या तर्फे आपली विमा कंपनी हाॅस्पिटलच्या बिलाचे पैसे भरते.
कॅशलेस विमा पॉलिसी प्रकार येथे पहा
कॅशलेस पॉलिसीमध्ये समाविष्ट नसणाऱ्या गोष्टी:
टॉयलेट बाथरूम मधील वस्तूंचा खर्च, ॲम्बुलन्स चा खर्च, डॉक्युमेंट चा खर्च, सहाय्यकाचा खर्च या खर्चाचा समावेश कॅशलेस पॉलिसी मध्ये होत नाही.
Cashless Mediclaim कॅशलेस पॉलिसी चे कार्य कसे असते?
विमा कंपन्या आपले विम्याचे दर, त्यांची गुणवत्ता तपासून विविध रुग्णालयांशी भागीदारी करू शकतात. त्यांना नेटवर्क रुग्णालय असे म्हटले जाते. जे हॉस्पिटल विमा कंपनी द्वारे ऑफर केलेल्या वैद्यकीय सेवांचा दर्जा देतात. त्या विमा कंपन्या हॉस्पिटल सोबत असलेल्या भागीदारीचे नूतनीकरण करतात. जे हॉस्पिटल तो दर्जा देत नाही. त्यांचे विमा कंपनी सोबत असलेल्या भागीदारीचे नूतनीकरण केले जात नाही. कॅशलेस सुविधा ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते. आपण हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर विमा कंपनीचा एजंट हॉस्पिटल सोबत समन्वय साधून आपल्याला कॅशलेस सुविधा मिळते.
कॅशलेस विमा पॉलिसी प्रकार येथे पहा
कॅशलेस सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला भरती झाल्यानंतर 24 तासांच्या आत विमा कंपनीला कळवावे लागते. त्यानंतर विमा कंपनीचा प्रतिनिधी किंवा तृतीय पक्ष प्रशासक येऊन आपल्याकडून फॉर्म भरून घेतला जातो. त्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये भरती असेपर्यंत होणारा खर्च हा विमा कंपनीकडून हॉस्पिटलमध्ये भरला जातो.
दावा अर्ज, हॉस्पिटल कडून मिळणारी कागदपत्रे, डिस्चार्ज कार्ड, आपण केलेल्या टेस्टची रिपोर्ट, हॉस्पिटलची बिले मेडिकल ची बिले ही कागदपत्रे हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेचच विमा कंपनीकडे द्यावे लागतात. विमा कंपनी कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांची तपासणी करते. काही कागदपत्रांची कमी असेल तर विमा कंपनी मागू शकते.
कॅशलेस विमा पॉलिसी प्रकार येथे पहा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- कुटुंब मालमत्ता व स्वतंत्र मालमत्ता म्हणजे काय?
- तुकडेबंदी कायदा मधील महत्त्वाच्या तरतुदी (Tukade Bandi Kayda)
- बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?
- अंत्योदय/ BPL नवीन राशनकार्ड व राशनकार्ड दुरूस्ती सुरू
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा.
Pingback: Children Vaccination मुलांच्या लसीकरणाचे सुद्धा मिळेल मोबाइल वर रिमायंडर | ऑगस्ट पासून येणार ॲप | - माहिती असाय
Pingback: Blue Chip Fund या फंडामुळे गुंतवणूकदार होणार मालामाल | - माहिती असायलाच हवी