consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा १९८६ हा देशात २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. या कायद्यातील तरतूदी नुसार राज्यस्तरावर राज्य आयोग व ३८ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यान्वित आहेत.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर एक अध्यक्ष आणि दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्षपदी निवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा न्यायाधीश होण्यास पात्र अशा व्यक्तीची नेमणूक करण्यात येते.
तर जिल्हा मचावरील दोन अशासकीय सदस्यांपैकी एक पद महिलांसाठी राखीव असून सदस्य पदासाठी विधी, अर्थ, प्रशासकीय, सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीची निवड करण्यात येते.
तक्रार कोण दाखल करू शकतो, येथे क्लिक करा
consumer protection act ग्राहक कोणास म्हणावे ?
आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरुपात वस्तू आणि सेवांचे ग्राहक असते. अगदी टाचणं पासून ते कॉम्प्युटर पर्यंतच्या असंख्य वस्तू आणि भाजी, अन्न धान्य, बँक , इन्शुरन्स, पोस्ट आरोग्य आणि शिक्षण अशा विविध सेवा याचेही आपण ग्राहक असतो. इतकेच काय परंतु विविध वस्तूंचे उत्पादक आणि सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थासुद्धा इतर क्षेत्रातील उत्पादने आणि सेवा यांचे ग्राहक असतात.
त्यामुळे ग्राहक हक्क हा नागरिक हक्कातील अत्यंत महत्वाचा हक्क ठरतो. ग्राहक संरक्षण अधिनियमात ग्राहक या शब्दांची व्याखा माल आणि (वस्तू) आणि सेवा यांच्या संदर्भात स्वतंत्रपणे व्याख्या करण्यात आली आहे व त्या व्याख्येनुसार ग्राहक म्हणजे पुढील प्रवर्गात मोडणारी कोणतीही व्यक्ती असा होतो.
मोबदला देऊन अथवा तो देण्याचे मान्य करून अथवा वचन देऊन तसेच स्थगित प्रदानाच्या (डिफर्ड पेमेन्ट) कोणत्याही पद्धतीनुसार वस्तू व सेवा खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक होय.
तक्रार कोण दाखल करू शकतो, येथे क्लिक करा
मोफत सेवांचा लाभ घेणारी व्यक्ती ग्राहक समजली जात नाही. व्यापारी किंवा पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने वस्तू खरेदी करणारी व्यक्ती ग्राहक समजली जात नाही.
तथापि, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वस्तू खरेदी केल्यास मात्र ती व्यक्ती ग्राहक समजली जाते.
ग्राहकांचे हक्क –
- सुरक्षिततेचा हक्क
- वस्तू अथवा सेवा या संबंधी माहिती मिळविण्याचा हक्क.
- निवड करण्याचा हक्क.
- बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क
- तक्रार निवारण्याचा हक्क
- ग्राहक शिक्षणाचा हक्क
तक्रार कोण दाखल करू शकतो, येथे क्लिक करा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Credit Card Information जाणून घेऊया क्रेडिट कार्ड चे फायदे-तोटे ..!
- Panchayat Samiti जाणून घेऊया पंचायत समिती बद्दल
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Rajiv Gandhi Awas Yojana बेघर व अल्पभूधारकांसाठी राज्य सरकारची राजीव गांधी आवास योजना…
- kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.