Railway Accident Compensation रेल्वे अपघातात नुकसान झाल्यानंतर भरपाई कशी मिळते..…?

Railway Accident Compensation

Railway Accident Compensation ओडिसा मधील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ही 288 च्या पुढे गेली आहे. तर 11,340 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत.

मृत्यू पावलेल्या नागरिकांना पंतप्रधान कार्यालयाने दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, तर जखमी झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

अपघातात झालेल्या नुकसानीमुळे प्रवाशांना भरपाई देता यावी, यासाठी रेल्वे ने नियमांमध्ये वेळोवेळी बदल केलेले आहेत. 

MSRTC Scheme पूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त १,१०० रुपयात….. एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’!!!

एखादी व्यक्ती जखमी असेल तर:

एखाद्या व्यक्तीचे अपघातामध्ये दृष्टी गेली असेल किंवा त्या व्यक्तीची श्रवण शक्ती कमी झाली असेल, तर त्या व्यक्तीला आठ लाख रुपयांची भरपाई दिली जाते. जर चेहरा विद्रूप झाला असेल तरीही तेवढीच रक्कम भरपाई म्हणून दिली जाते.

हे वाचले का?  Marriage Certificate विवाह नोंदणी प्रक्रिया | नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे |

याव्यतिरिक्त जखमी व्यक्तीच्या दुखापतीच्या तीव्रतेनुसार त्या व्यक्तीला 32 हजार रुपये ते आठ लाख रुपयांपर्यंतची भरपाई ही दिली जाते.

तुमची केस लढण्या करता मोफत वकील अर्ज कसा करावा?

Railway Accident Compensation कोणत्या परिस्थितीला अपघात मानले जाते?

रेल्वे कायदा 1989 च्या 13 व्या प्रकरणांमध्ये असे नमूद केले आहे की, जर अपघातामुळे एखाद्या प्रवाशाच्या मृत्यू झाला किंवा गंभीर शारीरिक इजा झाली तर, त्यास रेल्वे विभाग जबाबदार राहील.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील टक्कर किंवा प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरल्यास जखमींना भरपाई दिली जाईल. तसेच ट्रेनमध्ये काम करताना अपघात झाल्यास भरपाई दिली जाईल.

नुकसान भरपाई कोणाला मिळणार नाही?

कायदेशीर कृत्यामुळे झालेली दुखापत किंवा आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ मनाने कोणतेही कृत्य करून स्वतःला इजा पोहोचविणे, तसेच स्वतःला झालेली इजा यासाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही.

विधी सेवा प्राधिकरण तुमची कोर्ट केस लढण्यासाठी येथे मिळतात मोफत वकिल आणि सल्ला

भरपाई कशी मिळू शकते?

रेल्वे कायदा 1989 च्या 125 नुसार अपघातामध्ये मृत झालेली व्यक्ती किंवा पीडित व्यक्ती यांचे कुटुंबीय किंवा आश्रित नुकसान भरपाई साठी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकतात.

हे वाचले का?  SARTHI Pune विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!

अनुचित घटना किंवा पॅसेंजर ट्रेन अपघात घडल्यानंतर लगेच संबंधित RCT खंडपीठाकडे नोंदी उपलब्ध करून द्याव्या, म्हणजे जे जखमी आणि मृत व्यक्तींचे सर्व तपशील मिळवू शकतात आणि दावेदारांना अर्ज पाठवू शकतात.

दावा सादर केल्यानंतर त्याची चौकशी केली जाते. रेल्वे कडून प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी आरसीटीला सर्व शक्य असलेले सहकार्य केले जाते.

Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!

रेल्वेला RCT कडून नोटीस मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत अशा प्रकरणांमध्ये लेखी निवेदन द्यावे लागते.

मुख्य हक्क अधिकाऱ्यांना आठ लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती नुकसान भरपाई चे दावे निकाली काढण्याचे अधिकार आहेत.

अर्जदाराने आपल्या राहण्याचे ठिकाण किंवा ज्या ठिकाणाहून तिकीट खरेदी केले आहे ते ठिकाण किंवा अपघात जिथे घडला आहे त्या जागेचे अर्जात नमूद करावे.

नुकसान भरपाई चा अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

हे वाचले का?  Title Clear Property 'टायटल क्लिअर' जमीन म्हणजे नेमकं काय?

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top