Fixed deposit फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात..
Fixed deposit सध्याच्या महागाईच्या काळात मिळालेल्या आपल्या उत्पन्नातून पैशांची बचत करणे कठीण झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपण कमावलेल्या पैशांमधून काही रक्कम ही बचत झाली पाहिजे. कुठे तरी पैशांची गुंतवणूक करावी. या गुंतवणुकीमुळे आपल्या संकट काळी काळात आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपल्या समस्या कमी होतील. आपल्या जीवनातील आनंद वाढेल.
पैशांची बचत करण्यासाठी आज काल वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी एक मार्ग म्हणजे मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा एक चांगला पर्याय आहे.
फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात
Fixed deposit फिक्स डिपॉझिट(एफडी)
पैशांची एक सरळ आणि सुरक्षित बचत करण्याचा एक मार्ग म्हणजे फिक्स डिपॉझिट. एफडी अकाऊंट बनवल्यानंतर गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यापूर्वीच माहिती होते की, तुमची एवढी मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला किती लाभ मिळणार आहे. एफडी खाते हे कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येते.
एफडी मधील गुंतवणूक केलेले पैसे हे ठराविक कालावधी च्या अगोदर काढता येत नाही. एखाद्या गुंतवणूकदाराला काही कारणास्तव एफडी मधील रक्कम काढावयाची झाल्यास त्या व्यक्तीला गुंतवणूकदाराला याबद्दल आपल्या बँकेला किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आधी सांगणे आवश्यक आहे. निर्धारित केलेल्या कालावधीच्या आधी जर एफडी मोडायची असेल किंवा त्यातील पैसे काढायचे असतील तर गुंतवणूकदाराला दंड आकारण्यात येतो.
फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात
फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात:
एफडी चा कालावधी:
फिक्स डिपॉझिट (एफडी) मध्ये जास्तीत जास्त दहा वर्ष आणि कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. एफडी करताना त्याचा कालावधी किती असावा हे ठरवताना गुंतवणूकदाराने काळजीपूर्वक विचार करावा लागेल. कारण तुमची एफडी मॅच्युअर होण्याआधीच त्यातील पैसे काढावयाचे असेल तर गुंतवणूकदाराला दंड भरावा लागेल. मॅच्युअर होण्याआधीच एफडी मधील पैसे काढले तर गुंतवणूकदाराला 1% पर्यंत दंड भरावा लागू शकतो. यामुळे तुमच्या ठेवीवरती जे काही व्याज मिळते, ते कमी होऊ शकते. त्यामुळे जास्त लाभ मिळेल. या लोभा साठी दीर्घ काळापर्यंत एफडी करावयाचे टाळावे.
फिक्स डिपॉझिट करताना या गोष्टी ठेवा लक्षात
एफडी वर मिळणारे व्याज काढावे का?
गुंतवणूकदाराने केलेल्या एफडी वर अधिक गुंतवणूकदाराला तीन महिन्यांनंतर किंवा वार्षिक आधारावर व्याज काढता येत होते. आता हाच कालावधी एक महिन्यांपर्यंत आला आहे. म्हणजेच मासिक आधारावरती ही गुंतवणूक दाराला व्याज काढता येते. गुंतवणूक दाराच्या गरजेनुसार हा पर्याय गुंतवणूकदाराला निवडता येऊ शकतो.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Title Clear Property ‘टायटल क्लिअर’ जमीन म्हणजे नेमकं काय?
- Jamin Records सातबारा जुने खाते उतारे जुने फेरफार पहा आता मोबाईलवर….
- Loan Borrower Rights कर्जदार म्हणून तुमचे कोणते अधिकार आहेत..?
- Mahila Sanman Yojana समजून घेऊया काय आहे महिला सन्मान बचत पत्र योजना..?
- Aadhar Card असे डाऊनलोड करा हरवलेले आधारकार्ड…..!
- Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!
- Adhar Card loan काही मिनिटात मिळवा आधार कार्ड वरती लोन….
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.