ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार आणि आर्थिक साहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग लोकांचे नेतृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही ग्रामसभा व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रतिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांच्या निर्धाराने व सहभागाने व ग्रामसभा ने होतात.
लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला महत्व आहे ग्रामसभा म्हणजेच गावाची सर्वसाधारण सभा व ग्रामपंचायत म्हणजेच ग्राम सभेची कार्यकारी समिती असे एकंदरीत स्वरूप असते. ग्राम सभा सर्व जाती वर्गांना सामावून घेणारी, व्यक्तींचे प्रतिष्ठा व समतेचा पुरस्कार करणारी असते.
ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!
गावातील सर्व मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेद्वारे सरकारी कामावर देखरेख अन्याय-अत्याचार भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याचे काम करता येते. त्याशिवाय समस्यांचा विचार करून त्या सोडविण्यासाठी योजना आखणे व त्या अमलात आणणे शक्य होते.
ग्रामसभेची वैशिष्ट्ये:-
- प्रातिनिधिक अधिकारांपेक्षा वेगळा.
- लोकांची क्षमता मान्य करणारा व त्यास वाव देणारा
- ग्रामस्थांच्या कुवतीवर विश्वास ठेवणारा.
- खऱ्या अर्थाने विकेंद्रित लोकशाही बळकट करणारा आहे म्हणूनच ग्राम सभेचा आग्रह धरावा.
ग्राम सभा-कायदेशीर तरतुदी:
- एका वर्षात किमान चार ग्रामसभा घेतल्या पाहिजेत जास्तीत जास्त कितीही घेता येतील.
- ग्राम-सभा च्या 2 सभा दरम्यान दरम्यान चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी असता कामा नये.
- सरपंच यांनी योग्य कालावधीत सभा न बोलविल्या सचिव ग्राम सभा बोलावेल. ग्रामसभा सरपंचाच्या किंवा उपसरपंचाच्या सहमतीने बोलाविली असे मानले जाईल.
- पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच किंवा त्यांच्या गैरहजेरीत उपसरपंच असेल. नंतरच्या ग्रामसभेचा अध्यक्ष ग्राम सभा सदस्यांतून निवडता येईल.
ग्रामसभा ही गावातील विकासाचे निर्णय घेणारी सर्वोच्च वैधानिक संस्था आहेत तर ग्रामपंचायत ही साधारणतः ग्रामसभेतील निर्णय ठरावांची अंमलबजावणी करणारे संस्था आहेत.
पहिली ग्रामसभा १ मे ला होईल. दुसरी ग्राम सभा 15 ऑगस्ट, तिसरी नोव्हेंबर व चौथी 26 जानेवारी या दिवशी घेण्यात यावी. अन्य ग्रामसभा किमान सात दिवसाची वेळ देऊन सर्व निरोप पोहोचून सर्वसमावेशक व सर्वोच्च सोयीच्या वेळी घेता येईल.
महिला ग्राम सभेचे इतिवृत्त नियमित ग्राम-सभेपुढे सरपंच ठेवतील, ग्रामसभा त्यातील शिफारशींचा विचार करील. शिफारशींची सहमत नसल्यास कारणांची नोंद करील.
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेला अंदाजपत्रकाची ग्रामसभा असे म्हणतात. इतरवेळी आवश्यक वाटल्यास जादा ग्रामसभा सरपंच बोलू शकतात. पंचायत समिती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेवरून ही जादा ग्राम सभा बोलवली जातील.
गावात काम करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांवर ग्रामसभेचे शिस्त विषयक नियंत्रण असेल. आशा कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन ग्रामसभेकडून त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. अगर ग्रामसभा सदरचे अधिकार ग्रामपंचायतीला सोपवू शकते.
ग्राम सभेची नोटीस 7 पूर्ण दिवस आधी दिली पाहिजे. जादा ग्राम सभेची नोटीस चार दिवस आधी दिली पाहिजे. ग्रामसभेच्या नोटिशीत सभेचा दिवस वेळ जागा व सभेपुढील विषयी माहिती लिहिली पाहिजे.ग्रामसभा, ग्रामसभेची वेळ, दिनांक आणि ठिकाण तिच्या अगोदरच्या सभेत निश्चित करेल.
ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या प्रभागात नियमित सभेपूर्वी पूर्वी सभा घेऊन प्रभागातील विकास प्रकल्प कार्यक्रम याबाबत विचारविनिमय करून त्यांचे इतवृत्त सदस्यांनी सहीनिशी ठेऊन त्याची एक प्रत ग्रामपंचायतीला पाठवली पाहिजे सदर. दलित, आदिवासी, महिला व तरुणांचा आशा-आकांक्षा व्यथा-वेदना वाव देणारा गावाचा शहाणपणा सदिच्छा कर्तृत्व व्यक्त करणारा लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा
.राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या व्यक्तिगत लाभधारक नियोजनाकरिता लाभधारकांची निवड ग्राम सभा करील.जसे की अनुदानावरील शेती व अन्य अवजारे व उपकरणे शालेय मुलींना सायकल वाटप विधवा वेतन योजना शेतमजूर वृद्धापकाळ योजना तसेच इतर सर्व अन्य योजना.
ग्रामपंचायतीला सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजना कार्यक्रम किंवा प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यापूर्वी ग्रामसभेकडून मान्यता घ्यावी लागेल.विकास योजना व कोणताही खर्च करण्यास पंचायतीला ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागेल रस्ते बांधणे हे बाजारतळ बांधणे नाली बांधणे अन्य विकास कामे करणे.
शासकीय कामाकरिता जमीन अधिग्रहीत करण्यासाठी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक राहील. ग्रामसभेने बहुमताने ठराव दिला तरच पुढे राज्य शासनास जमीन अधिग्रहित करता येईल अन्यथा नाही.ग्रामसभेच्या प्रत्येक नेहमीच सभेपूर्वी ग्रामसभेच्या महिला सदस्यांची सभा घेण्यात येईल.
ग्राम-सभेत काय मागाल?
१. मागील वर्षाचा ग्रामपंचायतीचा छापील जमाखर्च (एप्रिल)
२. महिला ग्राम सभेचा अहवाल.
३. परिपत्रकांचे वाचन ग्रामसेवकांनी केले पाहिजे.
४. हिशोब तपासणी ऑडिट रिपोर्ट शंका उत्तरे
५. अंदाजपत्रक मान्यता (नोव्हेंबर)
६. मंजूर अंदाजपत्रक वाचन.
७. चालू वर्षात झालेल्या व करावयाच्या विकास कामांची माहिती.
८. ग्रामशिक्षण समिती, रेशन दक्षता समिती व ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती निवड व अहवाल वाचन.
९. महिलांसाठी दहा टक्के राखीव निधीचा योग्य वापर.
१०. अनुसूचित जाती जमातीसाठी 15 टक्के निधी.
हे वाचले का?
- Gav Rasta Samiti गाव रस्ते, शेतरस्ते, शिव रस्ते रस्ते मोकळे होणार
- Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप
- Police Station Civilian Right नागरिकांचे अधिकार
- Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
अतिशय उपयुक्त माहीती!