Grape Farm Protection राज्यात होणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर चा शासकीय योजनेत समावेश करण्यात आला आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना ही केंद्रशासित योजना असून या योजनेअंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर हे अनुदानावर दिले जाणार आहे. यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
गारपीट अवकाळी पाऊस यांपासून द्राक्ष बागांचे संरक्षण होण्यासाठी प्लास्टिक कव्हर वापरण्यात येईल. यासाठी एकरी दोन लाख 40 हजार 672 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.
योजनेचा उद्देश:
- गारपीट अवकाळी पाऊस यापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे.
- शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या आणि प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- फळबागांकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
- कृषी क्षेत्रात ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे.
आवश्यक कागदपत्रे Grape Farm Protection
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुकची झेरॉक्स
- जात प्रमाणपत्र
- विहित नमुन्यातील हमीपत्र
- बंधपत्र आणि चतु:सीमा नकाशा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
- शेतकऱ्यांना ठिबक सिंचन ८०% अनुदान मिळणार.
- विजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 50 हजार मिळणार
- kanda chal anudan yojana कांदा चाळ अनुदान योजना- पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा
- Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!
- Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज..
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Pingback: Madh Kendra Yojana मधकेंद्र योजना : सरकार देणार 50% अनुदान | शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची नवी संधी | - माहिती