Maha E Seva Kendra देशातील लोकांना सरकारी सेवांचा लाभ चांगल्या प्रकारे मिळाव्यात, या हेतूने सरकारकडून सर्व सरकारी सेवा डिजीटल केल्या जात आहेत. या उद्देशाने सरकारने Maha E Seva Kendra ही योजना सुरू केली. महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळत आहे.
Maha E Seva Kendra महा ई सेवा केंद्र म्हणजे काय?
केंद्र शासनाकडून तयार करण्यात आलेल्या नॅशनल गव्हर्नन्स योजनेअंतर्गत देशातील सामान्य लोकांना सेवा प्रदान करण्यासाठी सीएससी सेंटर म्हणजेच महा-ई-सेवा केंद्र स्थापन केले गेले आहे. महा ई सेवा केंद्र द्वारे सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील ज्या सेवा आहेत त्या लोकांना अगदी सहजरीत्या मिळवता येतात.
महा ई सेवा केंद्र उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
महाराष्ट्र राज्यातील लोकांना सरकारी सेवांचा योग्यरित्या सहजरित्या लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारकडून महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जे इच्छुक लोक आहेत ते महाराष्ट्र राज्यात किंवा जिल्ह्यात त्यांचे महा-ई-सेवा केंद्र उघडू शकतात आणि ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यास मदत करू शकतात.
या योजनेमार्फत पैसे देखील मिळवू शकतात. ज्या व्यक्तीला महा-ई-सेवा केंद्र उघडायचे आहे, त्या व्यक्तीने महा-ई-सेवा केंद्राच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि त्याद्वारे त्याची नोंदणी पूर्ण करावी. महा-ई-सेवा केंद्र हे अनेक लोकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले आहे. महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या ज्या लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवायचा आहे, त्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-ई-सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तेथे जाऊन विविध प्रकारच्या सरकारी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यामुळे त्या व्यक्तीचा पैसाही वाचतोच सोबत वेळही वाचतो.
महा ई सेवा केंद्राचा उद्देश:
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे. महा-ई-सेवा केंद्र मार्फत लोकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. त्यासोबतच महा-ई-सेवा केंद्रात जाऊन विविध शासकीय योजनांसाठी ऑनलाइन अर्ज ही करता येणार आहे.
महा ई सेवा केंद्र स्थापन झाल्यामुळे नागरिकांना एखाद्या योजनेचे लाभ घेण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही किंवा शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. महा-ई-सेवा केंद्र जाऊनच अर्ज करू शकतील. महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागत नाही. महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन हे पूर्णपणे निशुल्क आहे.
महा ई सेवा केंद्र उघडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे येथे पहा
महा-ई-सेवा केंद्र (Maha E Seva Kendra) उघडण्यासाठी पात्रता:
- इच्छुक व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
- व्यक्तीचे वय किमान 18 वर्ष असावे.
- इच्छुक व्यक्ती हे दहावी उत्तीर्ण असावी
- महा-ई-सेवा केंद्र उघडू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मराठी, हिंदी तसेच इंग्रजी या भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.
- त्याचप्रमाणे संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे
असा मिळेल परवाना:
जर महा-ई-सेवा केंद्र आपल्या शहरात सुरू करावयाचे असेल तर त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आवश्यक असते. परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागतो. कागदपत्र तपासून तुम्हाला महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मिळते आणि युजर आयडी आणि पासवर्ड देखील मिळतो. तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे सादर करून इतर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Ayushman Bharat Health Insurance या योजनेंतर्गत होणार ५ लाख रूपयांपर्यत उपचार | असा घ्या लाभ |
- shasan Aplya Dari II ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना |
- Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना
- Pan Card-Aadhar Link लवकर करा आधार-पॅन कार्ड लिंक, नाहीतर पॅनकार्ड होणार निष्क्रिय….
- Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!
- 1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Pingback: Sim Card Update तुमचे जुने सिम कार्ड कोणी वापरत तर नाही ना..? - माहिती असायलाच हवी