Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!

Adoption law

दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती

दत्तक बाबत हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम (Adoption law), १९५६ मध्ये तरतुद केलेली आहे. या अधिनियमातील दत्तक संदर्भातील महत्वाची माहिती खालील प्रमाणे: भारतातील सर्व हिंदू धर्मियांना लागू आहे.

Adoption law कलम ६ दत्तक ग्रहणासाठी आवश्यक बाबी

 1. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला दत्तक क घेण्याची क्षमता व अधिकार असावा.
 2. दत्तक देणाऱ्या व्यक्तीला दत्तक देण्याची क्षमता असावी.
 3. हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम १९५६ (Adoption law ) या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करुन झालेले दत्तकग्रहण बेकायदेशीर असेल, मग असे दत्तकग्रहण कोणत्याही जातीच्या व्यक्तींमधील असो.

दत्तक अधिनियमातील शर्ती येथे पहा

 • काही जमातीमध्ये दत्तक ग्रहणाच्या (Adoption law ) वेळी होम-हवन विधी आवश्यक मानले जातात, परंतु या कायद्यानुसार अशा विधीची आवश्यकता नसते.
 • दत्तक ग्रहणाचा दस्तऐवज नोंदणीकृत करता येतो.
 • कलम ७ हिंदू पुरुषाची दत्तक घेण्याची क्षमता. अविकल मनाचा सज्ञान पुरुष पुत्र किंवा कन्या घेऊ शकतो. दत्तक ग्रहणाच्या वेळी अशा पुरुषाला एकाहून अधिक हयात पत्नी असतील तर सर्व पत्नींची संमती आवश्यक असेल.
हे वाचले का?  रु.200 मध्ये घर-जमीन नावावर करता येणार....!!

कलम ८ हिंदू स्त्रीची दत्तक (Adoption law ) घेण्याची क्षमता.

 • अविकल मनाची, सज्ञान स्त्री जी विवाहित नाही अथवा जिचा विवाह घटस्फोट झालेला आहे किंवा जी विधवा आहे किंवा जिच्या पतीने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा तो हिंदू राहिला नसेल किंवा सक्षम न्यायालयाने त्याला विकल मनाचा घोषित केले असेल तर अशी हिंदू स्त्री पुत्र किंवा कन्या दत्तक घेण्यास सक्षम असेल.
 • या अधिनियमान्वये, मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि सजान हिंदू स्त्रीला स्वत:हून व स्वत:साठी दत्तक घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

दत्तक अधिनियमातील शर्ती येथे पहा

4 कलम ९ दत्तक देण्यास सक्षम व्यक्ती.

 1. फक्त आपल्याची माता किंवा पिता किंवा पालक याच व्यक्ती दत्तक देण्यास सक्षम आहेत.
 2. पिता हयात असेल तर त्याला एकट्याला दत्तक देण्याचा अधिकार आहे परंतू दत्तक देण्यासाठी मातेची संमती आवश्यक असेल. जर मातेने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा ती हिंदू राहिली नसेल किंवा सक्षम न्यायालयाने तिला विकल मनाची घोषित केले असेल तर तिची संमती आवश्यक नसेल.
 3. जर पिता मरण पावला असेल किंवा त्याने प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा तो हिंदू राहिला नसेल किंवा सक्षम न्यायालयाने त्याला विकल मनाचा घोषित केले असेल तर माता आपल्याला दत्तक देऊ शकेल.
 4. जर आपल्याचे माता-पिता ज्ञात नसतील किंवा मरण पावले असतील किंवा त्या दोघांनी प्रपंचाचा संपूर्ण आणि कायमचा त्याग केला असेल अथवा ते दोघे हिंदू राहिले नसतील किंवा सक्षम न्यायालयाने त्यांना विकल मनाचे घोषित केले असेल तर आपत्याचा पालक, न्यायालयाच्या पूर्व परवानगीने आपत्य दत्तक देऊ शकेल.
हे वाचले का?  Title Clear Property 'टायटल क्लिअर' जमीन म्हणजे नेमकं काय?

दत्तक अधिनियमातील शर्ती येथे पहा

शब्दार्थ

पिता किंवा माता या शब्दप्रयोगात दत्तक घेणारे माता किंवा पिता यांचा समावेश होत नाही.
पालक: या शब्दाचा अर्थ आपल्याच्या देहाची किंवा आपल्याच्या देहाची आणि मालमतेची देखभाल करणारी व्यक्ती असा होतो. अशी व्यक्ती त्या आपत्याची माता किंवा पिता किंवा माता आणि पिता यांच्या मृत्युपत्रा द्वारे किंवा सक्षम न्यायालयाद्वारे नियुक्त किंवा घोषित असू शकते.

कलम १० दत्तक घेतली जाण्यास सक्षम व्यक्ती.

 1. अशी व्यक्ती हिंदू असावी.
 2. अशी व्यक्ती आधीच दत्तक घेतली गेली नसावी.
 3. अशी व्यक्ती अविवाहित असावी. परंतू दत्तक घेणार्‍यांत विवाहित व्यक्ती दत्तक घेण्याची इच्छा असेल किंवा त्यांच्या कुटुंबात तशी रुढी, परंपरा असेल तर ही अट लागू होणार नाही.
 4. अशा व्यक्तीचे वय १५ वर्षापेक्षा जास्त नसावे. परंतू दत्तक घेणार्‍याची इच्छा असेल किंवा त्यांच्या कुटुंबात तशी रुढी, परंपरा असेल तर वयाची ही अट लागू होणार
हे वाचले का?  Domestic Violence act कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा २००५

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

 1. विहीर सोलर पंप अनुदान योजना शेतकऱ्यांना मिळणार सहा लाख अनुदान
 2. जमीन NA करण्याची गरज नाही (Jamin NA karnyachi garaj nahi).
 3. सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?
 4. सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana
 5. पोलीस पाटील (Police Patil) यांना निवडणूक लढवता येते का ?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

3 thoughts on “Adoption law दत्तक अधिनियमातील महत्त्वाची माहिती…..!!”

 1. Pingback: UMED-MSRLM Jalgaon Recruitment महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, जळगाव येथे विविध जागांसाठी भरती - naukri

 2. Pingback: Mahapareshan Recruitment 10वी व ITI पास उमेदवारांसाठी महापारेषण, पुणे येथे अप्रेंटिसची सुवर्णसंधी | लवकर करा अर्ज| - na

 3. Pingback: Credit Card असा करा क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर | - माहिती असायलाच हवी

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top