नियोजन विभाग, रोहयो प्रभागाच्या शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०२१/प्र.क्र.२९/रोहयो-१० अ, दि. ११/११/२०२१ अन्वये आता आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान “मातोश्री ग्राम समृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
या शासन निर्णयातील परिच्छेद २१ मध्ये अभिसरणातून शेत / पाणंद रस्ते तयार करणे यासाठी निधी उपलब्ध करुन घेण्यासाठीच्या अन्य योजनांची यादी दिलेली आहे.
सदर यादीमध्ये अ.क्र. २ अन्वये खासदार/आमदार स्थानिक विकास कार्यक्रम ” या योजनांकरिता उपलब्ध निधीचा एकत्रतिपणे वापर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधी पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना” राबविण्याकरीता इतर स्रोतांसह उपयोगात आणण्यात येत असल्याने तसेच नियोजन विभाग,
शासन निर्णय क्र: स्थाविका-०६१६ / प्र.क्र.९६ / का. १४८२. दिनांक १२ जुलै २०१६ अन्वये आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान “मातोश्री ग्राम समृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना
“आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण क्षेत्रात रस्त्यांची कामे हाती घेणे अनुज्ञेय असल्याने गाव नकाशांमध्ये पाणंद रस्त्यांची नोंद घेण्यात आली असल्यास,
अशा रस्त्यांसाठी नियोजन विभाग, रोहयो प्रभागाचा शासन निर्णय क्र. मग्रारो-२०२१/प्र.क्र.२९/रोहयो-१० अ दि. ११ नोव्हेंबर, २०२१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या इतर स्त्रोतांतून अभिसरणाद्वारे घेऊन.
प्राप्त होणारा निधी विचारात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत एका कामासाठी असलेल्या कमाल आर्थिक मर्यादेत उर्वरित आवश्यक निधी “मातोश्री ग्राम समृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना अंतर्गत कामांकरिता उपलब्ध करून देता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे शासन परिपत्रक उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२११२१५१७३७०११४१६ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
हे वाचले का?
- मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशु आरोग्य सेवा उपलब्ध होणार.
- मंत्रिमंडळ बैठक निर्णय अनाथ मुलांना आरक्षण तर नोकरदार महिलांना वस्तीगृह योजना
- श्रावणबाळ योजना (Shravan Bal Yojana) सेवा राज्य निवृत्ती वेतन
- संजय गांधी निराधार (Sanjay Gandhi Niradhar) अनुदान योजना
आमदार खासदार देणार शेतरस्ते करता अनुदान शासननिर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा