MSRTC Scheme महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळाकडून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना त्यात महिलांसाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे. महामंडळ नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते.
या लेखामध्ये आपण बघणार आहोत की, एसटी महामंडळाकडून अशीच एक नवी योजना राबवण्यात येत आहे ती म्हणजे आवडेल तिथे प्रवास योजना. माहिती शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.
प्रवाशांना एकदम कमी खर्चात विविध ठिकाणी राज्यात प्रवास करता यावा, तसेच प्रवाशांना एक नियोजन तयार करून मैत्रीपूर्ण आणि स्नेहपूर्ण नाते निर्माण व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी ‘आवडेल तिथे प्रवास’ ही योजना सुरू करण्यात आली.
आता आपण बघूया की आवडेल तिथे प्रवास प्रक्रिया कशी आहे याची माहिती.
आवडेल तिथे प्रवास पासची किंमत आणि वैधता येथे पहा
MSRTC Scheme आवडेल तिथे प्रवास पास प्रक्रिया:
‘आवडेल तिथे प्रवास’ या योजनेअंतर्गत प्रवास करण्यासाठी नागरिकांना चार दिवसांच्या पास साठी वर्षातून दोन फेऱ्या म्हणजेच दोन हंगाम करण्यात आलेले आहे. पहिली फेरी 15 ऑक्टोबर ते १४ जून आणि दुसरी फेरी ही 15 जून ते 14 ऑक्टोबर अशी आहे.
दोन्ही फेऱ्यांचा कालावधी हा सारखाच आहे. परंतु यांच्या किमतीत मात्र भिन्नता असणार आहे, अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये चार दिवसांकरिता प्रवासाचा पास काढता येतो.
या योजनेअंतर्गत प्रवासासाठी नागरिकांकडून शासकीय महामंडळाच्या गाड्या म्हणजेच शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, लाल परी या बसची निवड केली जाते.
आवडेल तिथे प्रवास पासची किंमत आणि वैधता येथे पहा
हे असतील पाच धारकांसाठी नियम:
- आवडेल तिथे प्रवास या योजनेअंतर्गत प्रवासी व्यक्ती ही आवडती सीट ची मागणी करत असेल, तर तो प्रवासी पासचा गैरवापर होत आहे, असे समजण्यात येईल.
- जर एखाद्या व्यक्तीचा पास हरवला तर, त्या व्यक्तीला दुसरा पर्याय पास दिला जाणार नाही.
- पासचा जर गैरवापर करण्यात येत असेल, तर पास वेळीच जप्त करण्यात येईल.
- प्रवासादरम्यान पासधारकांची कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली तर, त्यास महामंडळ जबाबदार राहणार नाही.
- आवडेल तिथे प्रवास या माध्यमातून पास धारक प्रवास करत असतील आणि त्या व्यक्तीच्या पासची वैधता समाप्त झालेली असेल तर, अशावेळी त्या प्रवाशाकडून तिकीट आकारले जाईल.
- स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.
- संप किंवा काम बंद आंदोलन यामुळे राज्य परिवहन वाहतूक बंद असल्यास प्रवासी सदर पास वर प्रवास करूच शकले नाही, तर प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा किंवा मुदतवाढ देण्यात येईल. ही मुदत वाढ किंवा परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.
आवडेल तिथे प्रवास पासची किंमत आणि वैधता येथे पहा
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Health Insurance Policy Portability जाणून घेऊ या एक विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीमध्ये आरोग्य विमा बदलण्याचे फायदे- नुकसान..!
- PM Kusum Solar Scheme शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी….. सौर कृषी पंप अर्जासाठी अंतिम मुदत नाही….!!
- Career After 12th बारावीचा निकाल जाहीर, आता पुढे काय..? जाणून घेऊ या उपलब्ध असलेले विविध कोर्सेस..!!
- PM ShramYogi Mandhan Yojana प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना: काय आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!
- Uniform Civil Code जाणून घेऊया समान नागरी कायदा म्हणजे काय….? काय आहेत फायदे….?
- Non Agricultural Land Certificate आता जमिन NA करण्याची गरज नाही
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.