Income Tax Return For Housewife नोकरी किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असते. जर तुम्ही कोणतीही नोकरी करत नाही किंवा व्यवसाय करत नाही, तरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. त्याचप्रमाणे गृहिणींना सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरणे फायदेशीर ठरू शकते.
गृहिणींना घर कामातून थोडा वेळ काढून इन्कम टॅक्स रिटर्न देता येतो. त्यातून गृहिणींना अनेक फायदे मिळतात. आपण बेरोजगार आणि गृहिणींना इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर कोणते फायदे मिळतात ते बघणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर नक्की करा.
कोणतेही उत्पन्न नसताना भरल्या जाणाऱ्या इन्कम टॅक्स रिटर्नला नील रिटर्न किंवा शून्य रिटर्न म्हटले जाते. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर गृहिणींना अनेक फायदे मिळतात.
कर्ज घेण्यासाठी उपयुक्त:
जर एखाद्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे असेल तर अशा वेळेस बँक ही नियमित उत्पन्न किती आहे आणि आयटीआर किती आहे हे बघतात. यामुळे जर गृहिणींना एखादा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यांना आयटीआर चा फायदा होतो.
व्हिसा साठी उपयुक्त:
नील आयटीआर मुळे व्हिसा मिळणे सोपे होते. अनेक देशांच्या व्हिसा साठी दहा वर्षांपर्यंतचा आयटीआर भरणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आयटीआर भरते ती व्यक्ती कायदे पालन करणारी आहे हे आयटीआर मधून सिद्ध होते. तसेच अर्जदार हा त्याच्या मायदेशी परतण्यास सधन आहे हे पण सिद्ध होते.
टीडीएस परतावा सुलभ होतो:
काही गृहिणींच्या नावाने मुदत ठेवी म्हणजेच एफडी असतात. ज्यावेळी एफडी परिपक्व होते. त्यावेळेस त्यावर टीडीएस कापला जातो. ज्यावेळेस करदाता हा 15 जी किंवा एच फॉर्म भरायला विसरला असेल, तर अशा वेळेस टीडीएस हा कापला जातो. अशावेळी कर परतावा मिळण्यासाठी आयटीआर असणे आवश्यक आहे.
Income Tax Return For Housewife शून्य रिटर्न केव्हा दाखल करावे?
ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या व्यक्तींना कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु असे लोक सुद्धा आयटीआर भरू शकतात. भरला जाणारा कर हा शून्य असतो, म्हणून त्यास नील किंवा शून्य रिटर्न म्हणतात.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- maharashtra cabinet minister list राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते खाते मिळाले?
- How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |
- Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |
- Divyang Loan दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज | पात्रता | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा |
- सरपंच जबाबदार्या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi
- Dr Punjabrao Deshmukh Scholarship डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना २०२३
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा