Sinchan Vihir Anudan सिंचन विहिरी साठी मिळणार अनुदान असा करा अर्ज..!!

Sinchan Vihir Anudan

Sinchan Vihir Anudan शासनाकडून मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी खोदून देण्यात येतात. यासाठी शासनाकडून चार लाख रूपयांपर्यंतचे अनुदान मिळते.

या लेखात आपण बघणार आहोत की सिंचन विहिरी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता आहेत, आवश्यक कागदपत्रे काय आहेत.

लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचा व आवडल्यास शेअर नक्की करा.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे येथे पहा

Sinchan Vihir Anudan लाभधारकाची निवड:

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियमाच्या तरतुदींमध्ये नुसार खालील प्रवर्गासाठी सिंचन सुविधा म्हणून विहिरीचे कामे अनुज्ञेय आहेत:

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निरधीसुचित जमाती
  • दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी
  • स्त्री कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखाली लाभार्थी
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी अधिनियम 2006 (2007 चा दोन)खालील लाभार्थी
  • सीमांत शेतकरी (अडीच एकर पर्यंत भूधारणा)
  • अल्पभूधारक ( 5 एकर पर्यन्त भूधारणा)

विहीर कुठे खोदावी व कुठे खोदू नये, येथे पहा

लाभार्थी पात्रता:

  • लाभ धारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • महाराष्ट्र भूजल अधिनियम 1993 च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन अनुज्ञेय करू नये.
  • दोन सिंचन विहिरींमधील दीडशे मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही i) दोन सिंचन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही run off zone तसेच अनुसूचित जाती व जमाती वर दारिद्र्य रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये. ii) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार नाही
  • लाभधारकाच्या सातबारा उताऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
  • लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
  • एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे.
  • ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
हे वाचले का?  Apang Pension Yojana अपंग व्यक्तींना मिळणार दरमहा ६०० रुपये | पहा काय आहे योजना | आवश्यक कागदपत्रे | पात्रता |

Sinchan Vihir Anudan विहिरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती:

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे येथे पहा

इच्छुक लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र – अर्जाचा नमुना व ब-संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतीच्या अर्ज पेटीत टाकावे. ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्यतोवर ऑनलाईन अर्ज करावा।

अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येईल. त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाइन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीचे जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाचे राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईन साठी डाटा एन्ट्री करावी लागली, तरी त्यांनी ती करावी.

हे वाचले का?  Education System शिक्षण मंडळाचा नवीन निर्णय, तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी !!!

वरील प्रमाणे प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवकास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील.

विहीर कुठे खोदावी व कुठे खोदू नये, येथे पहा

ग्रामपंचायत किंवा ग्रामसभा:

मंजुरी मनरेगाच्या कार्य पद्धतीप्रमाणे कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीच्या मान्यतेने लाभार्थ्याची निवड करता येते. योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या यादीत त्यापुढील होणार्‍या ग्राम सभेसमोर ठेवण्यात यावे. गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात यावी.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

हे वाचले का?  ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’: कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी योजना |

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top