ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च | Grampanchayat Bandhankarak Kharch

Grampanchayat Bandhankarak Kharch

गावाच्या विकासाची पूर्ण जबाबदारी ही गावाच्या ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर असते. ही जबाबदारी पार पाड न्यायासाठी राज्य व केंद्र सरकार याच्या कडून विविध निधी हा ग्रामपंचायतींनी दिला जात असतो. हा निधी खर्च करणे ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च असतो. याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत.

Grampanchayat Bandhankarak Kharch

१५ % रक्कम प्रतिवर्षी मागासवर्गीय यांच्या साठी खर्च करणे बंधनकारक

ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च ग्रामपंचायतींनी त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी कमीत कमी १५ टक्के रक्कम प्रतिवर्षी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

(संदर्भ: महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन आदेश ग्रापत्र १०८९/५४/प्र.क्र.१०५३/२१ अ, दिनांक १८ नोव्हेंबर १९८९ आणि परिपत्रक दि. १८ जानेवारी १९८९ तसेच महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक DCT २३१६ / प्रक्र १३३/का. १४१७, दि. ५/१२/२०१६)

हे वाचले का?  Bandhkam Parvana Gram Panchayat ग्रामपंचायत मध्येच मिळणार बांधकाम परवानगी

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi

एकूण उत्पन्न यामध्ये कर वसुली देणगी, पंचायतीला मिळालेली सर्व अनुदाने इत्यादीचा समावेश होतो. एकूण उत्पन्नामध्ये शासकीय योजना, वित्त आयोगाचा निधी, पाणी पट्टीची वसुल रक्कम याचा समावेश होत नाही. १५% रकम अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या सामुहिक विकासासाठी व त्या वर्गातील व्यक्तींचा वैयक्तिक लाभ होईल अशा योजनांवर, त्या त्या जाती जमातीच्या ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च केली पाहिजे.

१५% रक्कम खर्च करावयाच्या बाबी

सदर रक्कमेमधून खाली नमूद केलेल्या बाबींवर खर्च करता येईल.

अंगणवाडी, अभ्यासिका, गणवेश, मुलांचे शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, घरदुरुस्ती, लघुउद्योग अर्थसहाय्य, पाणी पुरवठा सोयी, विहिर दुरुस्ती, वस्ती जोड रस्ते, समाज मंदिर दुरुस्ती, क्रिडांगणे इ. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजना सर्व संबंधितांना देता येतील.

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार

१५% रक्कम खर्च न करण्याच्या बाबी

सदर रक्कमेमधून खाली नमूद केलेल्या बाबींवर खर्च करता येणार नाही.

मनोरंजन, सहली, चैनीच्या वस्तु खरेदी, जाहिरात, पुतळे, स्मारके, मेळावे, दिवा बत्ती साहित्य.

हे वाचले का?  Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांचे पद रद्द कधी होते? चला तर मग समजावून घेऊया.

ग्रामपंचायत उत्पन्नाचे १०% महिला व बाल-कल्याण

करिता करावयाचा खर्च (संदर्भ : शासन निर्णय ग्रामविकास व जल संधारण विभाग ZP /1097/CR/966/05 दि. १२.०८.१९९७) ग्रामपंचायत स्वउत्पन्नाच्या १०टक्के रक्कम महिला व बालकांच्या सर्वागिण विकासाकरिता खर्च करणे बंधनकारक आहे.

सदर खर्च हा अंगणवाडी, महिला, बालके, मुलांच्या शैक्षणिक सहली, बचत गटाच्या सहली, अंगणवाडी सुशोभिकरण व फर्निचर या करिता करणे अपेक्षित आहे. उदा. अंगणवाडी आयएसओ (ISO) करणे, गावातील बालके व गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करणे, महिला व बालकांना साहित्य वाटप करणे, रोग निदान व प्रबोधन शिबिरे घेणे इ. करिता

ग्रामपंचायतीचे विभाजन नवीन किंवा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना

ग्रामपंचायतीस बंधनकारक खर्च दिव्यांगाकरिता ५ टक्के खर्च

(संदर्भ: ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक २०१८ / प्रक्र ५४ / वित्त – ३, दि. २५ जून २०१८ ) ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नाचे ५ टक्के रक्कम दिव्यांगांचे कल्याणा करिता खर्च करणे बंधनकारक आहे. सदरील रक्कमेतून दिव्यांगाकरिता आरोग्य तपासणी शिबीर, साहित्य खरेदी, शिक्षणाचा खर्च, वैयक्तिक लाभाच्या योजना, दिव्यांगाकरिता आवश्यक असणारा अन्य खर्च करणे अपेक्षित आहे. दिव्यांगांनी ग्रामपंचायतीच्या या वैयक्तीक लाभाच्या योजनांकरिता अधिकृत प्राधिकरणाचे ऑनलाईन प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. दिव्यांगाना या योजनांचा लाभ घेण्यासाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. वैयक्तीक लाभ देताना लाभार्थींना वस्तुरुपाने लाभ न देता लाभार्थींच्या बँक खातेवर वस्तु खरेदीनंतर थेट निधी वर्ग करण्यात येतो.

हे वाचले का?  Sarpanch Pagar Salary गावाच्या सरपंचाला पगार किती

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top